देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी – संत मुक्ताबाई अभंग


४५
देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी |
तया घातली पुशी योगेश्वरीं ॥१॥
दिवसा चांदिणे रात्री पडे उष्ण |
कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥२॥
ऋषीं म्हणे चापेकळिकाळ मैं कांपे |
प्रकाश पिसे मनाच्या धारसें एक होय ॥३॥
एकट एकलें वायांचि पै गुंफलें |
मुक्त में विठ्ठलें सहज असे ॥४॥
वैकुंठ अविट असोनि प्रकट वायांचि |
आडवाट मुक्ताई म्हणे ॥५॥