अविट हे न विटे हरिचे हे गुण – संत मुक्ताबाई अभंग
२०
अविट हे न विटे हरिचे हे गुण ।
सवे सनातन ध्यातां रूपें ॥१॥
साध्य हैं साधन हरिरूपें ध्यान ।
रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥२॥
असंधि बटु नटलों में साधे नाहीं ।
त्या यमाचें भय आम्हां ॥३॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली ।
साधना दिधली चांगयासी ॥४॥