अवघी साधन हातवटी – संत मुक्ताबाई अभंग


१२
अवघी साधने हातवटी ।
मोले मिळत नाही हाती ।
शुद्ध ज्याचा भाव ।
त्याला दूर नाही देव ॥
आपण जैसे व्हावे ।
अवघे अनुमानोनी घ्यावे ।
ऐसे केले सद्गुरुनाथे ।
बापरखुमादेवीकांते ॥
कोणी कोणास शिकवावे |
सारासार शोधूनि घ्यावे ।
तुम्ही तरुनि विश्व तारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥