अंतर बाह्य निकें सर्व इंद्रियांचे चोज – संत मुक्ताबाई अभंग


२९
अंतर वाह्य निकें सर्व इंद्रियांचे ।
चोज निजी निजबीज एकतत्त्व ॥१॥
आदि नाहीं अनादि नाहीं ।
तें रूप पाही अविट बाईये ॥२॥
मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण ।
आकार सगुण प्रपंचींचा ॥३॥