अलिप्त संसारी हरिनामपाठें – संत मुक्ताबाई अभंग
९
अलिप्त संसारी हरिनामपाठे ।
जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥१॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदां ।
संसारआपदा भाव तोडी ॥२॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी ।
चेतविला हरि आप आपरूपें ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदां ।
अभिनव भेदा भेदिलें ॥४॥