अहो क्रोधे यावें कोठे – संत मुक्ताबाई अभंग


११
क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे ।
ऐसे कळले ज्याला पूर्ण जनी तेचि जनार्दन ॥
ब्रीद बांधले चरणी ।
नीच दाविता करणी वेग ।
क्रोधाचा उगवला अवघा ।
योग फोल झाला ।
ऐसी दूरदृष्टी करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥