निर्गुणाचा संग धरिला जो आवडी – संत गोरा कुंभार अभंग
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥
एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव ।
तुह्मा आह्मा नांव कैचे कोण ॥ ४ ॥