कैसें बोलणें कैसें चालणें – संत गोरा कुंभार अभंग


कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥