सत्य करी आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन । आमुचें विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥
इंद्रबारी चंद्र कर्हेरी । यम पाणी वाहे घरोघरीं । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथें करी दळाकांडा ॥२॥
अश्विनी देव दोन्हीं । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥
मारको केली तरळी । सटवी बाळातें पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥
मैराळ देव कानडा । करी राक्षसांच्या दाढ । आरसा न दाखवी ज्यापुढा । तो रोकडा बुकाली ॥५॥
विघ्न राहुं न शके ज्यापुढें । तो गणेशबापुडें । गाढवांचें कळप गाढे । एका जनार्दनीं वळीत ॥६॥