येणें कृष्णें आमुचें खादलं दुध दहीं । फोडोनि टाइलें भाजनें पाहीं ॥१॥
आवरी आवरी बाई आपुला कान्हा । न कळे याची कारणी ब्रह्मादिकां नये ध्याना ॥२।।
घेऊनियां पोरें घरामध्यें येतो पाहे । चोरी करुनियां पळुनी जातो लवलाहें ॥३॥
एका जनार्दनीं किती सांगू गार्हाणें । पुन्हां आलिया यासी शोक लावीन सत्य जाणे ॥४॥