देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती ॥१॥
पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥
वरिल्या मंडपा मुंगीये धरिलें । त्रिभुवनीं व्यापिलें मकुड्यानें ॥३॥
एका जनार्दनीं मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥

वाकीभ

संत साहित्य, अभंग, ओव्या आणि ग्रंथांचा समृद्ध मराठी संग्रह. वारकरी परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार हा आमचा प्रयत्न.

मेन्यू मुखपृष्ठ ग्रंथ अभंग/भजन संत विभाग संपर्क vakibhmedia@gmail.com 9225354427 पुणे, महाराष्ट्र

© २०२६ वाकीभ. सर्व हक्क सुरक्षित.