प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥
दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥
पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥