धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥
कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥
प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौर्यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥
गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥
ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥