क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥
येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥
एका जनार्दनीं एकातांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥