सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥
नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥
पडाल यमाचे पीडणीं । लक्ष चौर्यांयशीं पतनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥