बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥१॥
बाइलेसी नेसवी धट्टी । माते न मिळे लंगोटीं ॥२॥
बाइलें षड्रास भोजन । माते न मिळे कोरान्न ॥३॥
बाईल बैसवी आपुलें घरीं । माते हिंडवीं दारोदारीं ॥४॥
एका जनार्दनीं शरण । ऐसें पुत्राचें अवगुण ॥५॥