पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी ॥१॥
नायके शिकविलें । म्हणे म्हातार्यासी वेड लागलें ॥२॥
बाईल बोलताचि जाण । पुढें करून धांवे कान ॥३॥
ऐसें नसावें संतान । वायां भूमीभार जाण ॥४॥
एका जनार्दनीं अमंगळ । त्याचा होईल विटाळ ॥५॥