देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥
स्त्री हातीं देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥
जें जें आणि तें तें थोडें । धनधान्य आवडें कुडें ॥३॥
ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्यांयशीं वेरझारा ॥४॥
सोडविता नाहीं कोण्ही । एका जनार्दनावांचुनी ॥५॥