नाम गातां करीं आळस । निंदा करी बहु उल्हास ॥१॥
कोणी गातसे हरिनाम । तयासी तो अधम उपहासी ॥२॥
आपणा घरीं नाहीं कण । भांडारिया म्हणे बुद्धिहीन ॥३॥
नेणें कधीं स्वप्नीं भाव । मानीं देव वेगळाची ॥४॥
एका जनार्दनीं तें पामर । भोगिती अघोर चौर्यायंशीं ॥५॥