ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा ॥१॥
हातें मोर्या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥
गाईस देखुनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें झाले प्राणी । जन्मोनियां जनीं व्यर्थ आले ॥४॥