वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां ।
भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥
थिता बाईल कां सांडिली । आशा परवंधूं कां धुंडिली ।
शुभ्र सांडोनि भगवी कां गुंडिली । ऐसी भंडी कांहो मांडिली ॥२॥
तुम्हा प्रपंचावर एके घाई रुसवेना । अहं ज्ञातेपणा कोण्हा पुसवेना ।
एका जनार्दनीं मन जिंकवेना । मेल्या कुतर्यासारखें कां बसवेना ॥३॥
अभाविक – खल – दुर्जन