तीर्था जाती उदंड । त्याचें पाठीमागें तोंड ॥१॥
मन वासना ठेउनी घरीं । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥
गंगेंत मारितां बुडी । मन लागलें बिर्हाडीं ॥३॥
नमस्कार करितां देवासी । मन पायपोसापाशीं ॥४॥
लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥
एका जनार्दनीं स्थिर मन । नाहीं तंव काय साधन ॥६॥