भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥
सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥
संग्रह यत्नाचीया चाडा । मोहोळ अवघा कडा ॥३॥
मोहोळ झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥
सर्व मायीक पदार्थ । एका जनार्दनीं परमार्थ ॥५॥