अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥
कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥
चोरुनी शिदोर्या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥
एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥