वाकीभ लोगो

संत एकनाथ अभंग ६६७ ते ६६७

संत एकनाथ अभंग ६६७ ते ६६७

अभंग ६६७

अकार उकार मकार नामचि ठेविलें

अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥
जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥
नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥
एका जनार्दनीं नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥