आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ आरती ज्ञानराजा ॥ धृ० ॥

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ १ ॥

कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें ।
रामजनार्दनीं । पायी मस्तक ठेविलें ॥ ३ ॥