वाकीभ लोगो

संत चोखामेळा अभंग

संत चोखामेळा महाराज अभंग

अभंग १

अनादि निर्मळ वेदांचें

अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥
आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥
अभंग २

अनाम जयासी तेचं

अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥
अभंग ३

अवघा प्रेमाचा पुतळा

अवघा प्रेमाचा पुतळा ।
विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी ।
तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा ।
गाये नाचे चोखामेळा ॥३॥
अभंग ४

अंगिकार करी तयाचा

अंगिकार करी तयाचा विसर ।
न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटी ।
उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभपर ।
वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळू माउली ।
उभी ती राहिली विटेवरी ॥४॥
अभंग ५

आणिक दैवतें देतीं

आणिक दैवतें देतीं काय बापुडीं ।
काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा ।
न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटणी ।
न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥
अभंग ६

आपुलिया सुखा आपणचि

आपुलिया सुखा आपणचि आला ।
उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति ।
शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा ।
कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥
अभंग ७

उतरले सुख चंद्रभागे

उतरले सुख चंद्रभागे तटीं ।
पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें ।
ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती ।
तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर ।
न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥
अभंग ८

करी सूत्र शोभे

करी सूत्र शोभे कटावरी ।
तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
पायीं वाजती रूणझुण घंटा ।
तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥
काम चरणींचा तोडरू ।
परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥
दक्षिण चरणीचा तोडरू ।
जयदेव पदाचा गजरू ॥४॥
विठेवरी चरण कमळा ।
तो जाणा चोखामेळा ॥५॥
अभंग ९

गोजिरें श्रीमुख चांगलें

गोजिरें श्रीमुख चांगलें ।
ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं ।
वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी ।
पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीट कुंडलें ।
प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥
अभंग १०

चोखट चांग चोखट

चोखट चांग चोखट चांग ।
एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणीं ।
अवघी सुकृतांची खाणी ॥२॥
महापातकी नासले ।
चोखट नाम हें चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा ।
विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥
अभंग ११

ज्या काणें वेद

ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती ।
तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी ।
तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणें उभवोनी हात ।
उदारपणें देत भक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ ।
स्त्री क्षूद्र चांडाळ सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला ।
म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥५॥
अभंग १२

ज्या सुखाकारणें योगी

ज्या सुखाकारणें योगी शिणताती ।
परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें ।
उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमागें ।
भक्ताचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेलें ।
नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी ।
कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥
अभंग १३

दुर्लभ होतें तें सुलभ

दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें ।
आपण नटलें सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें ।
उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार ।
वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरूड टके पताका शोभती ।
बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड ।
उभ उभी कोड पुरवितो ॥५॥
अभंग १४

देखिला देखिला योगियांचा

देखिला देखिला योगियांचा रावो ।
रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस ।
धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा ।
नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण ।
घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥
अभंग १५

निगमाचे शाखे आगमाचें

निगमाचे शाखे आगमाचें फळ ।
वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज ।
सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस ।
तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन ।
संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
अभंग १६

पाहतां पाहतां वेधियेला

पाहतां पाहतां वेधियेला जीव ।
सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा ।
कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता ।
विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं ।
चोखामेळा दंडवत करी ॥४॥
अभंग १७

बहुत कनवाळु बहु

बहुत कनवाळु बहु हा दयाळु ।
जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥
जात वित गोत न पाहेचि कांहीं ।
घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥
न मागतां आभारी आपेंआप होती ।
भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी ।
भवभय वारी दरूशने ॥४॥
अभंग १८

बहुतांचे धांवणे केलें

बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी ।
उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं ।
उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला ।
न कळे ज्याची लीला ब्रम्हादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी ।
दरूशनें उद्धरी जडजीवां ॥४॥
अभंग १९

भक्तांचिया लोभा वैकुंठ

भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिलें ।
उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरी ।
जडजीवा उद्धरी नामें एका ॥२॥
बांधियेलें ब्रीद तोडर चरणीं ।
त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल ।
नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥
अभंग २०

भाविकांच्या लोभा होऊनी

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत ।
उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा ।
गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड ।
भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली ।
कृपेची साउली दीनां करी ॥४॥
अभंग २१

मज तो नवल

मज तो नवल वाटतसे जीवी ।
आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रम्हा भुललें ।
गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें ।
विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ ।
दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥
अभंग २२

मुळींचा संचला आला

मुळींचा संचला आला गेला कोठें ।
पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा ।
योगियांचा राणा पंढरिये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात ।
वाट जो पहात अनुदिनी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ ।
दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥
अभंग २३

विठोबा पाहुणा आला

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा ।
निंबलोण करा जीवें भावें ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती ।
ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट ।
जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥
अभंग २४

व्यापक व्यापला तिन्हीं

व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं ।
चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती ।
ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट ।
जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥
अभंग २५

सकळा आगराचें जें

सकळा आगराचें जें मूळ ।
तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती ।
तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा ।
भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला ।
त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥
अभंग २६

सर्वही सुखाचें वोतिलें

सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख ।
त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्हीं कटीं सम पाय विटे ।
शोभले गोमतें बाळरूप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचे धन ।
चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥
अभंग २७

सुंदर मुखकमल कस्तुरी

सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं ।
उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ ।
देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं ।
गरूडवाहन हरी देखियला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर ।
निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥
अभंग २८

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण ।
रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी ।
इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन तेणें वोळे ।
शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणें बोध ।
सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ ।
चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥
अभंग २९

श्रीमुख चांगले कांसे

श्रीमुख चांगले कांसे पितांबर ।
वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥
तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा ।
भेटवा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धावणें केलें नानापरी ।
पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी ।
तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥
अभंग ३०

श्रीमुखाची शोभा कस्तुरी

श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट ।
उभा असे नीट विटेवरी ॥१॥
कर दोनीं कटीं कुंडल झळकती ।
तेज हे फांकती दशदिशा ॥२॥
वैजयंती माळा चंदनाची उटी ।
टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु ।
पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥
अभंग ३१

अवघी पंढरी भुवैकुंठ

अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी ।
नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं ।
पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें ।
तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे ।
सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवलें कर दोनीं कटावरी ।
ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनी ।
सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी ।
चोखा परोपरी नाचतसे ॥७॥
अभंग ३२

इनामाची भरली पेठ

भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट 
संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी ।
वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी ।
घेत पायवणी संतांची ॥४॥
अभंग ३३

जाणतें असोनी नेणतें

जाणतें असोनी नेणतें पैं झालें ।
सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो ।
न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा ।
त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर ।
तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥
अभंग ३४

टाळी वाजवावी गुढी

टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें ।
दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥
अभंग ३५

न करी आळस

न करी आळस जाय पंढरीसी ।
अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान ।
घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं ।
तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक ।
चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥
अभंग ३६

पंढरीचें सुख नाहीं

पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥
अभंग ३७

पुंडलिकें सूख दाखविलें

पुंडलिकें सूख दाखविलें लोकां ।
विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी ।
पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं ।
नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं ।
जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥
अभंग ३८

बहुत हिंडलो देश

बहुत हिंडलो देश देशांतर ।
परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों ।
मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या ।
मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ ।
मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥
अभंग ३९

विठ्ठल विठ्ठल गजरीं

विठ्ठल विठ्ठल गजरीं ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥
अभंग ४०

वैकुंठ पंढरी भिंवरेचे

वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें ।
धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा ।
वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान ।
विटे समचरण ठेवियेले ॥४॥
अभंग ४१

सुखाची सुखराशि पंढरीसी

सुखाची सुखराशि पंढरीसी आहे ।
जावोनियां पाहे अरे जना ॥१॥
अवघाचि लाभ होईल तेथींचा ।
न बोलावे वाचा मौनावली ॥२॥
अवघिया उद्धार एकाचि दरूशनें ।
भुक्तिमुक्ति केणें मिळे फुका ॥३॥
प्रत्यक्ष चंद्रभागा अमृतमय साचार ।
जडजीवा उद्धार पहातां दृष्टी ॥४॥
चोखा म्हणे आनंदें नाचा महाद्वारीं ।
वाचे हरि हरि म्हणे मुखें ॥५॥
अभंग ४२

शुद्ध चोखामेळा

शुद्ध चोखामेळा ।
करी नामाचा सोहळा ॥१॥
यातीहीन मी महार ।
पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती ।
म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ ।
आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥
अभंग ४३

नेणते तयासी नेणता

नेणते तयासी नेणता लहान ।
थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा ।
रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें ।
उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी ।
गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥
अभंग ४४

आम्हां आनंद झाला

आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला ।
देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें ।
देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें ।
ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी ।
उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥
अभंग ४५

कर्मातें वाळिलें धर्मातें

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें ।
सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला ।
देहीच भेटला एव आम्हां ॥४॥
अभंग ४६

देवा नाहीं रूप

देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम ।
देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण ।
दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे ।
ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥
अभंग ४७

अखंड माझी सर्व

अखंड माझी सर्व जोडी ।
नामोच्चार घडोघडी ।
आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥
हाचि मानिला निर्धार ।
आतां न करी वाउगा विचार ।
वायां काय बा करकर ।
धरोनी धीर बैसलों ॥२॥
धरणें घेऊनि तुमचे द्वारीं ।
बैसेन उगाच मी गा हरी ।
कांही न करीं भरोवरी ।
नाम हरी गाईन ॥३॥
तुमची लाज तुम्हांसी ।
आपुलिया थोरपणासी ।
ब्रीद बांधिलें चरणासी ।
तें चोख्यासी दाखवीं ॥४॥
अभंग ४८

अगाध हे कीर्ति विठ्ठला

अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची ।
महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द ।
श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत ।
तेथें ती पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार ।
कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥
अभंग ४९

अधिकार माझा निवेदन

अधिकार माझा निवेदन पाई ।
तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥
अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती ।
विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥
कोणीही अंगिकार न करिती माझा ।
दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरीं ।
तरीच मज हरी सुख होय ॥४॥
अभंग ५०

अवघॆं मंगळ तुमचें

अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम ।
माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा ।
आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
या परतें मागणें दुजें नाहीं आतां ।
पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार ।
ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥
अभंग ५१

असेंच करणें होतें

असेंच करणें होतें तुला ।
तरी का जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें ।
कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं ।
केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा ।
नको मोकलूं केशवा ॥४॥
अभंग ५२

अहो पंढरीराया विनवितों

अहो पंढरीराया विनवितों तुज ।
अखंड संतरज लागो मज ॥१॥
नामाची आवडी उच्चार हा कंठी ।
करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥
पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद ।
तेणें सर्व बाध हरे माझा ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नवस ।
पुरवी सावकाश देवराया ॥४॥
अभंग ५३

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा ।
उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें ।
न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार ।
न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे ।
उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥
अभंग ५४

अहो पतित पावना

अहो पतित पावना पंढरीच्या राया ।
भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा ।
येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या ।
न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट ।
मग मी बोभाट न करी कांही ॥४॥
अभंग ५५

आतां नकां भरोवरी

आतां नकां भरोवरी ।
तूं तों उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशीं ।
अहर्निशी राखावें ॥२॥
ब्रीद गाजे चराचरीं ।
कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा ।
दृढ सरसा मानला ॥४॥
अभंग ५६

आतां कासया हा दाखवितां

आतां कासया हा दाखवितां खेळ ।
म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले ।
न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा ।
काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ ।
भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥
अभंग ५७

आतां कणकण न

आतां कणकण न करी वाउगी ।
होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोसे पोसणा ।
तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें ते झालें असो कां उदास ।
धरोनिया आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे ।
न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥
अभंग ५८

आतां याचा अर्थ

आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा ।
येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी ।
माझें तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया ।
कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास ।
पुरवावी आस मायबापा ॥४॥
अभंग ५९

आतां कोठवरी

आतां कोठवरी ।
भीड तुमची धरूं हरि ॥१॥
दार राखीत बैंसलों ।
तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥
ही नीत नव्हे बरी ।
तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलों ।
आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥
अभंग ६०

आतां कोठवरी करूं

आतां कोठवरी करूं विवंचना ।
कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥
सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी ।
जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलों हातीं ।
बहुत फजीति होय तेणें ॥३॥
नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें ।
सुख राई पाडें झालें मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे ।
बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥
अभंग ६१

आन साधनें सायास

साधनें सायास ।
कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास ।
ह्रदयीं वास असावा ॥१॥
हेचि मागतसे देवा ।
हीच माझी भोळी सेवा ।
पायांसी केशवा ।
हाचि हेवा मानसीं ॥२॥
जन्म देई संताघरीं ।
उच्छिष्टाचा अधिकारी ।
आणिक दुजी थोरी ।
दारीं परवरी लोळेन ॥३॥
नका मोकलूं दातारा ।
विनंती माझी अवधारा ।
अहो रुक्मादेवीवरा ।
आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥
अभंग ६२

आपुल्या आपण सांभाळोनी

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें ।
आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वायांचि करणें लौकिकाचा गोवा ।
कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें ।
खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें ।
माझें यांत उणें काय होतें ॥४॥
अभंग ६३

इतुकेंचि देई रामनान

इतुकेंचि देई रामनान मुखीं ।
संतांची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं ।
तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये ।
दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी ।
माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥
अभंग ६४

करोनियां दया

करोनियां दया ।
सांभाळा जी देवराया ॥१॥
मी तो पतीत पतीत ।
तुमचाचि शरणांगत ॥२॥
लाज येईल तुमचे नांवा ।
मज उपेक्षितां देवा ॥३॥
आपुलें जतन ।
करा अभय देवोन ॥४॥
चोखा म्हणे हरि ।
आतां भीड न धरीं ॥५॥
अभंग ६५

कवणावरी आतां देऊं

कवणावरी आतां देऊं हें दूषण ।
माझें मज भूषण गोड लागे ॥१॥
गुंतलासे मीन विषयाचें गळीं ।
तैसा तळमळी जीव माझा ॥२॥
गुंतला हरिण जळाचिया आशा ।
तो गळां पडे फांसा काळपाश ॥३॥
वारितां वारेना सारितां सारेना ।
कितीसा उगाणा करूं आतां ॥४॥
चोखा म्हणे ऐसा पडलों प्रवाहीं ।
बुडतसों डोहीं भवाचिया ॥५॥
अभंग ६६

कशासाठीं तुम्हां शरण

कशासाठीं तुम्हां शरण रिघावें ।
आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥
आमुचें संचित भोग क्रियामान ।
तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥
आमुचा तों येथें खुंटलासे लाग ।
न दिसे मारग मोकळाचि ॥३॥
चोखा म्हणे काय करूं आतां ।
तुमची हे सत्ता अनावर ॥४॥
अभंग ६७

कळेल तैसे बोल

कळेल तैसे बोल तुजचि बोलेन ।
भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥
काय करूं देवा दाटलों जाचणी ।
न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारूं केशवा ।
माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतां पुरे चाळवण ।
आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥
अभंग ६८

काय हें दु:ख किती

काय हें दु:ख किती ह्या यातना ।
सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥
जन्मावें मरावें हेंचि भरोवरी ।
चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करुणा न ये माझी देवा ।
चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण ।
म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥
अभंग ६९

काय हें मातेसी बाळें

काय हें मातेसी बाळें शिकवावें ।
आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥
तैसाच प्रकार तुमचीये घरीं ।
ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥
तेचि आजी दिसे वोखटें कां झालें ।
संचिताचें बळें दिसे ऐसें ॥३॥
चोखा म्हणे हा तो तुम्हां नाहीं बोल ।
आमुचें सखोल कर्म दिसे ॥४॥
अभंग ७०

कांहो केशिराजा दूजे

कांहो केशिराजा दूजे पैं धरितां ।
हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन ।
एक तेचि नग्न फिरताती ॥२॥
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न ।
एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासीं वैभव राज्याची पदवी ।
एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं ।
चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥
अभंग ७१

कांहीं तरी अभय न

कांहीं तरी अभय न मिळे उत्तर ।
ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥
मी तों कळवळोनी मारितसे हांक ।
तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
बोलोनी उत्तरें करी समाधान ।
ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आस ।
न करी उदास माझे माये ॥४॥
अभंग ७२

किती धांवाधांवी करावी

किती धांवाधांवी करावी कोरडी ।
न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितों तें तें फलकट ।
वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचें चिंतन ।
करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥
दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं ।
जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा ।
काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥
अभंग ७३

कोण माझा आतां

कोण माझा आतां करील परिहार ।
तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय ।
दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटीं ।
आतां नको तुटी करूं देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत ।
ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥
अभंग ७४

जगामध्यें दिसे बरें

जगामध्यें दिसे बरें की वाईट ।
ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आतां कोठवरी धरावी हे भीड ।
तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं ।
त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणें न ये उणेपण ।
तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥
अभंग ७५

जनक तूं माझा जननी

जनक तूं माझा जननी जगाची ।
करूणा आमुची कां हो नये ॥१॥
कासया संसार लावियेला पाठीं ।
पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥
जन्म जरा मरण आम्हां सुख दु:ख ।
पाहासी कौतुक काय देवा ॥३॥
गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारीं ।
विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥
अभंग ७६

जन्मांची वेरझारी

जन्मांची वेरझारी ।
तुम्हांविण कोण वारी ।
जाचलों संसारी ।
सोडवण करी देवराया ॥१॥
शरण शरण पंढरीराया ।
तुम्हां आलों यादवराया ।
निवारोनियां भया ।
मज तारा या सागरीं ॥२॥
तुम्हांविण माझें कोडें ।
कोण निवारी सांकडें ।
मी तों झालों असे वेडे ।
उपाय पुढें सुचेना ॥३॥
चोखा म्हणे दीनानाथा ।
आतां निवारीं हे भवव्यथा ।
म्हणोनी ठेवितसें माथा ।
चरणांवरी विठूच्या ॥४॥
अभंग ७७

जयांचियासाठीं जातो वनाप्रती

जयांचियासाठीं जातो वनाप्रती ।
ते तों सांगाती येती बळें ॥१॥
जयांचियासाठीं टाकिला संसार ।
ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥
जयाचिया भेणें घेतिलें कपाट ।
तो तेणें वाट निरोधिली ॥३॥
जयाचिया भेणें त्यागियेलें जग ।
तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥
चोखा म्हणे नको होऊं परदेशी ।
चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥
अभंग ७८

जिकडे पाहे तिकडे

जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी ।
सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥
परी तें वर्म मज न कळे कांहीं ।
अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥
एका पुढें एक पडती आघात ।
सारितां न सरत काय करूं ॥३॥
चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही ।
धांवे माझे आई विठाबाई ॥४॥
अभंग ७९

तुमच्या चरणी जें

तुमच्या चरणी जें कांही आहे ।
तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥
सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं ।
तें सुख शांति देई मज देवा ॥२॥
सर्वांभूती दया संतांची ते सेवा ।
हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥
चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं ।
जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥
अभंग ८०

तुम्हांसी शरण बहुत

तुम्हांसी शरण बहुत मागं आले ।
तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा ।
माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा ।
म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे ।
नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥
अभंग ८१

तुम्हीं वाढविलें तुम्हीं

तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें ।
तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥
तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा ।
आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥
तुम्हांसी तों भीड कासयाची देवा ।
हेचि केशवा सांगा मज ॥३॥
चोखा म्हणे काय बोलूं येयावरी ।
माझा तूं कैवारी देवराया ॥४॥
अभंग ८२

देवा कां हें साकडें

देवा कां हें साकडें घातिलें ।
निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥
समर्थे आपुल्या नामासी पाहावें ।
मनीं उमजावें आपुलिया ॥२॥
यातिहीन आम्हां कोण अधिकार ।
अवघे दूरदूर करिताती ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह ।
पडिला संदेह काय करूं ॥४॥
अभंग ८३

धरोनिया आशा टाकिलासे

धरोनिया आशा टाकिलासे ठाव ।
अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया ।
कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणें ।
तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां ।
काय आमुची कथा आतां चाले ॥४॥
अभंग ८४

धरोनी विश्वास राहिलेसें

धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं ।
नाम श्रीहरी आठवीत ॥१॥
कळेल तैसें करा जी दातारा ।
तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥
मी तंव धरणें घेवोनी बैसलों ।
आतां बोलों येयापरी ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नेम आतां ।
तुम्ही कृपावंत सिद्धि न्यावा ॥४॥
अभंग ८५

धांव घाली विठु आतां

धांव घाली विठु आतां चालुं नको मंद ।
मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥
तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा ।
अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥
कर जोडोनी चोखा विनवितो देवा ।
बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥
अभंग ८६

धीर माझे मना

धीर माझे मना ।
नाहीं नाहीं नारायण ॥१॥
बहुचि जाचलों संसारें ।
झालों दु:खाचे पाझरे ॥२॥
भोग भोगणें हें सुख ।
परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥
भारवाही झालों ।
वाउग्या छंदा नागवलों ॥४॥
दया करा पंढरीराया ।
चोखा लागतसे पायां ॥५॥
अभंग ८७

नाहीं देह शुद्ध याति

नाहीं देह शुद्ध याति अमंगळ ।
अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥
करूं जातां विचार अवघा अनाचार ।
आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥
वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन ।
धि:कारिती जन सर्व मज ॥३॥
अंगसंग कोणी जवळ न बैसे ।
चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥
अभंग ८८

नेणों तुमचे मन कठिण

नेणों तुमचे मन कठिण कां झालें ।
मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करूं ।
तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण ।
मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करूं तें आठवेना ।
निवांत वासना कई होय ॥४॥
अभंग ८९

नेत्रीं अश्रूधारा उभा

नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं ।
लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥
कां गा मोकलीलें न येसी गा देवा ।
काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा ।
न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा ।
पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥
अभंग ९०

बरें झालें येथें आलोंसे

बरें झालें येथें आलोंसे सायासें ।
सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥
मागिला लागाचें केलेंसे खंडण ।
तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरें मन ठेविले बांधोनी ।
निवांत चरणीं तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले ।
येर ते ही केले देशधडी ॥४॥
अभंग ९१

बरें हें वाईट आहे

बरें हें वाईट आहे माझे भाळीं ।
तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥
आतां कोणावरी रूसों नये देवा ।
भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जें संचित तैसें होत जात ।
वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे ।
झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥
अभंग ९२

बावरलें मन करीं

बावरलें मन करीं धांवा धावी ।
यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥
लागलासे चाळा काय करूं आतां ।
नावरे वारितां अनावर ॥२॥
तुमचें लिगाड तुम्हींच वारावें ।
आम्हांसी काढावें यांतोनियां ॥३॥
चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख ।
नका आतां दु:ख दाऊं देवा ॥४॥
अभंग ९३

भवाचिया भेणें येतों

भवाचिया भेणें येतों काकुळती ।
धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥
पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं ।
येवोनी सांभाळी देवराया ॥२॥
कवणाची असा पाहूं कोणीकडे ।
जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥
अभंग ९४

भ्रमण न करितां भागलों

भ्रमण न करितां भागलों जी देवा ।
न मिळे विसावा मज कोठें ॥१॥
लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं ।
आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥
सांपडलों वैरियाचे भांडवली ।
न कळे चिखलीं रोवियेलों ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा ।
तुम्हाविण फांसा उगवी कोण ॥४॥
अभंग ९५

मजचि कां करणें

मजचि कां करणें लागला विचार ।
परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥
कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति ।
न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
आणिक तो दुजा नाहीं अधिकार ।
कैसा हा विचार करूं आतां ॥३॥
चोखा म्हणे बहु होती आठवण ।
कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥
अभंग ९६

माझा मी विचार

माझा मी विचार केला असे मना ।
चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें ।
हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट ।
नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा ।
तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥
अभंग ९७

माझा तंव अवघा

माझा तंव अवघा खुंटला उपाय ।
रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥
करितोचि दिसे अवघेचि वाव ।
सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥
लिगाडाची माशी तैसी झाली परी ।
जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥
चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा ।
पाळा कळवळा माझा देवा ॥४॥
अभंग ९८

माया मोहोजाळे गुंतलोंसे

माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें ।
यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ ।
बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतांचें पूजन ।
मन समाधान कधीं नव्हे ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी ।
तेणें कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरें नागविलों ।
माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥
अभंग ९९

मी तो विकलों तुमचिये

मी तो विकलों तुमचिये पायीं ।
जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालों उतराई देवा ।
तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझें वाहे उदरीं ।
तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥
अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं ।
ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥
अभंग १००

यातीहीन मज म्हणती

यातीहीन मज म्हणती देवा ।
न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम ।
वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस ।
संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण ।
पदरीं घेतलें मज दीना ॥४॥
अभंग १०१

वारंवार किती करूं

वारंवार किती करूं करकर ।
माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण ।
होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे ।
हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित ।
तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥
अभंग १०२

श्वान अथवा सुकर

श्वान अथवा सुकर होका मार्जार ।
परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणें समाधान होय माझ्या जीवा ।
न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी ।
लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी ।
दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥
अभंग १०३

समर्थांसी रंकें शिकवण

समर्थांसी रंकें शिकवण जैशी ।
माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां ।
परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान ।
तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी ।
करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥
अभंग १०४

साच जें होतें तें

साच जें होतें तें दिसोनियां आलें ।
आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥
तुमचें उचित तुम्हींच करावें ।
आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥
विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं ।
तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हा नवलाव ।
न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥
अभंग १०५

सुखाचिया लागीं करितों

सुखाचिया लागीं करितों ।
तो अवघेंचि वाव येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना ।
अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडें दिसोनियां आलें ।
न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं ।
सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥
अभंग १०६

संसाराचें नाहीं भय

संसाराचें नाहीं भय ।
आम्हां करील तो काय ।
रात्रंदिवस पाय ।
झालों निर्भय आठवितां ॥१॥
आमुचें हें निजधन ।
जोडियेले तुमचे चरण ।
आणि संतांचें पूजन ।
हेंचि साधन सर्वथा ॥२॥
कामक्रोधादिक वैरी ।
त्यांसी दवडावे बाहेरी ।
आशा तृष्णा वासना थोरी ।
पिडिती हरी सर्वदा ॥३॥
आतां सोडवी या सांगासी ।
न करीं पांगिला आणिकांसी ।
चोखा म्हणे ह्रषिकेशी ।
अहर्निशीं मज द्यावें ॥४॥
अभंग १०७

हीन याती माझी

हीन याती माझी देवा ।
कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती ।
तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर ।
सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा ।
करूणा भाकी चोखामेळा ॥४॥
अभंग १०८

अखंड नामाचें चिंतन

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ ।
तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें ।
काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम ।
येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी ।
येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥
अभंग १०९

अवघा आनंद राम

अवघा आनंद राम परमानंद ।
हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार ।
आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात ।
वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा ।
जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥
अभंग ११०

अवघ्या साधनांचे

रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम ।
वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी ।
सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला ।
जीवलग भेटला मायबाप ॥४॥
अभंग १११

आतां माझा सर्व

आतां माझा सर्व निवेदिला भाव ।
धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात ।
तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार ।
झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा ।
विठोबा दातारा याचि नामें ॥४॥
अभंग ११२

आपुल्या स्वहिता वाचेसी

आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा ।
आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा ।
अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नक पडूं भरी ।
सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम ।
नको आन श्रम जाय वांया ॥४॥
अभंग ११३

आमुचें संचित जैसें

आमुचें संचित जैसें जैसें आहे ।
तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥
सुखें आठवीन तुमचें हें नाम ।
न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥
कासया करूं जिवासी आटणी ।
नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥
मागेही तरले पुढेंही तरती ।
चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥
अभंग ११४

आम्हां अधिकार उच्छिष्ट

आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन ।
संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम ।
आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें ।
संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा ।
पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥
अभंग ११५

आम्हां न कळे ज्ञान

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन ।
न कळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥
अभंग ११६

केला अंगिकार

केला अंगिकार ।
उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी ।
तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली ।
चोखा म्हणे मात केली ॥३॥
अभंग ११७

कोणासी सांकडें गातां

कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें ।
होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार ।
नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशि वसे नामापाशी ।
ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार ।
राम हा निर्धार जप करीं ॥४॥
अभंग ११८

गणिका अजामेळें काय

गणिका अजामेळें काय साधन केलें ।
नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥
नवल हें पहा नवल हें पहा ।
अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें ।
ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥
ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार ।
वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
सुफराटें नाम न येचि मुखासी ।
मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा ।
उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥
अभंग ११९

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें ।
नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी ।
नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम ।
गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा ।
भवभय पीडा येणें वारे ॥४॥
अभंग १२०

नाम हें सोपें जपतां

नाम हें सोपें जपतां विठ्ठल ।
अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान ।
तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती ।
बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन ।
तुटेल बंधन भवपाश ॥४॥
अभंग १२१

नामाचें सामर्थ्य विष

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत ।
ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल ।
नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन ।
सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा ।
येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥
अभंग १२२

नाशिवंतासाठीं करितोसी

नाशिवंतासाठीं करितोसी आटी ।
दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक ।
नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा ।
नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥
चोखा म्हणे येथें एकचि साधन ।
संतासी शरण जाईं सुखें ॥४॥
अभंग १२३

भवाचें भय न

भवाचें भय न धरा मानसीं ।
चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास ।
जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी ।
वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा ।
पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वांधिकार ।
उंच नीच अपार तरले नामें ॥५॥
अभंग १२४

भेदाभेद कर्म न

भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म ।
वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं ।
पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद ।
नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे ।
विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥
अभंग १२५

महादोष राशि पापाचे

महादोष राशि पापाचे कळप ।
नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करूं नका कोणी ।
नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव ।
आन ठावाठाव करूं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जिवितां वाचें ।
नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥
अभंग १२६

माझ्या तो मनें केलासे

माझ्या तो मनें केलासे विचार ।
आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥
नाम वेळोवेळां आठवावे वाचे ।
दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणीं ।
आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती ।
म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥
अभंग १२७

मोहळा मक्षिका गुंतली

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी ।
तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा ।
राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें ।
नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम ।
तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥
अभंग १२८

योग याग जप

योग याग जप तप अनुष्ठान ।
नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन ।
अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥
कासया फिरणें नाना तीर्थाटणी ।
कासया जाचणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल ।
सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥
अभंग १२९

राम हीं अक्षरें सुलभ

राम हीं अक्षरें सुलभ सोपारी ।
जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा ।
ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका ।
होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार ।
भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें ।
जपावें निधरिं एका भावें ॥५॥
अभंग १३०

वोखटें गोमटें असोत

वोखटें गोमटें असोत नरनारी ।
दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म ।
नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥
योगायोगादि जपतप कोटी ।
एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार ।
नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥
अभंग १३१

सूखा कारणें करी

सूखा कारणें करी तळमळ ।
जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा ।
चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
न लगे वेचावें धनाचिये पेटी ।
धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन ।
राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार ।
नाम एक सार विठोबाचें ॥५॥
अभंग १३२

हातींच्या कांकणा कासया

हातींच्या कांकणा कासया आरसा ।
धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार ।
जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट ।
नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती ।
नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥
अभंग १३३

आजि दिवस धन्य

आजि दिवस धन्य सोनियाचा ।
जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती ।
दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ ।
गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥
अभंग १३४

कोणी पंढरीसी जाती

कोणी पंढरीसी जाती वारकरी ।
तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडी ।
अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझें मायबाप सोयरे सज्जन ।
तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे ते माहेर निजाचें ।
जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥
अभंग १३५

माझा शिण भाग

माझा शिण भाग अवघा हरपला ।
विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें ।
समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी ।
विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार ।
होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ ।
आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥
अभंग १३६

माझ्या मना तूं

माझ्या मना तूं धरी कां विचार ।
न करी प्रकार आन कांहीं ॥१॥
पंढरीसी कोणी जाती वारकरी ।
सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥
तयाचिया सवें घडेल चिंतन ।
चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥
जागर क्षिरापती वैष्णव सांगाते ।
घडेल आपैतें लाभ मज ॥४॥
चोखा म्हणे घडेल संतांची संगती ।
सहज पंगती बैसेन मी ॥५॥
अभंग १३७

वेध कैसा लागला

वेध कैसा लागला वो जीवा ।
नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी ।
सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचें गाती जे नाम ।
ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी ।
क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण ।
जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥
अभंग १३८

सप्रेम निवृत्ति आणि

सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव ।
मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार ।
नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार ।
आणिक अपार वैष्णव जन ॥३॥
चोखा तया पायीं घाली लोटांगण ।
वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥
अभंग १३९

अखंड समाधी होउनी

अखंड समाधी होउनी ठेलं मन ।
गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी ।
तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी ।
मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा ।
जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥
अभंग १४०

असोनि नसणें या

असोनि नसणें या नांव स्वार्थ ।
येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥
स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं ।
अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥
सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें ।
मी आणि माझें परतें सारीं ॥३॥
चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा ।
जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥
अभंग १४१

असोनि नसणें संसाराचे

असोनि नसणें संसाराचे ठाईं ।
हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥
संतांची संगती नामाची आवडी ।
रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥
काम क्रोध सुनेपरी करी दूरी ।
सहपरिवारी दवडी बापा ॥३॥
चोखा म्हणे सुख आपेआप घरा ।
नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥
अभंग १४२

आपुला विचार न

आपुला विचार न कळे जयांसी ।
ते या संसाराशी पशू आले ॥१॥
पशूचा उपयोग बहुतांपरी आहे ।
हा तो वायां जाय नरदेह ॥२॥
परि भ्रांति भुली पडलीसे जीवा ।
आवडी केशवा नाठविती ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें ।
काय याचें वेचे धन वित्त ॥४॥
अभंग १४३

आला नरदेहीं पाहीं

आला नरदेहीं पाहीं ।
शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥
करी प्रपंच काबाड ।
भार वाही खर द्वाड ॥२॥
न ये राम नाम मुखीं ।
नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥
करी वाद अपवाद ।
नाही अंत:करण शुद्ध ॥४॥
मळ नासोनि निर्मळ ।
चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥
अभंग १४४

उदंड नागवले वाहावले

उदंड नागवले वाहावले पुरीं ।
ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥
ब्रम्हादिक जेणें बहु नागविले ।
सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥
इंद्रादि चंद्रा लावियेले काळें ।
कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥
प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी ।
तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥
वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी ।
अभिलाष करी मनें धरिला ॥५॥
चोखा म्हणे येणें बहु नाडियेले ।
काय आतां बोल जाय पुढें ॥६॥
अभंग १४५

ऊंस डोंगा परी

ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥
अभंग १४६

कोणें देखियेलें जग

कोणें देखियेलें जग ।
पांडुरंगा मी नेणें ॥१॥
मौन्यें पारूषली वाणी ।
शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधी कैचे दोन ।
मज पासोन मी नेणें ॥३॥
चोखामेळा म्हणती संत ।
हे ही मात उपाधी ॥४॥
अभंग १४७

घरदार वोखटें अवघें

घरदार वोखटें अवघें फलकटें ।
दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥
नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें ।
काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥
लावूनियां मोह भुलविलें आशा ।
त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥
सकळही चोर अंती हे पळती ।
चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥
अभंग १४८

जन्मला देह पोशिला

जन्मला देह पोशिला सुखाचा ।
काय भरंवसा याचा आहे ॥१॥
येकलेंचि यावें येकलेंचि जावें ।
हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती ।
अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥
अभंग १४९

जन्मांचे साकडें नाहीं

जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें ।
जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण ।
हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती ।
अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥
अभंग १५०

जन्मांचे साकडें नाहीं

जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें ।
जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण ।
हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती ।
अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥
अभंग १५१

जया जे वासना तया

जया जे वासना तया ती भावना ।
होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥
कामाचे विलग आवरावें चित्त ।
क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार ।
आवरावे साचार शांति सुखें ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग ।
तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
अभंग १५२

डोळियाचा देंखणा पाहतांच

डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी ।
डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा ।
आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला ।
देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥
अभंग १५३

तुटला आयुष्याचा दोरा

तुटला आयुष्याचा दोरा ।
येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें ।
अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती ।
कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर ।
माझें माझें म्हणे घर ॥४॥
अभंग १५४

तुम्ही तों सांकडें

तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें ।
आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥
आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं ।
तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग ।
धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें ।
तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥
अभंग १५५

देव म्हणे नारदासी

देव म्हणे नारदासी ।
जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥
तीर्थ निर्मळे संगमी ।
स्नान करी नारदस्वामी ॥२॥
नारदाची नारदी सरी ।
धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥
चोखा म्हणे हेंचि देई ।
स्नान घडो तये ठायीं ॥४॥
अभंग १५६

देह बुद्धीवेगळें जें

देह बुद्धीवेगळें जें आकारलें ।
निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा ।
तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला ।
नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥
चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक ।
सहज मीपण देख मावळले ॥४॥
अभंग १५७

देही देखिली पंढरी

देही देखिली पंढरी ।
विठू अविनाश विटेवरी ॥१॥
रुक्मिणी अंगना ।
आत्मा पुंडलिक जाणा ॥२॥
आकार तितुका नासे ।
निराकार विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसें गुज ठायीचा ठायी ।
चोखा म्हणे लागा पायी ॥४॥
अभंग १५८

दु:खरूप देह दु:खाचा

दु:खरूप देह दु:खाचा संसार ।
सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती ।
दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥
सोयरे धायरे कवणाचे कवण ।
अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा ।
सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥
अभंग १५९

धिक् तो आचार

धिक् तो आचार धिक् तो विचार ।
धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥
धिक् तें पठण धिक् तें पुराण ।
धिक् यज्ञ हवन केलें तेणें ॥२॥
धिक् ब्रम्हाज्ञान वाउग्या ह्या गोष्टी ।
दया क्षमा पोटी शांति नाहीं ॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा ।
वायांचि हे कंथा धरिली जेणें ॥४॥
चोखा म्हणे धिक् जन्मला तो नर ।
भोंगी नरक घोर अंतकाळीं ॥५॥
अभंग १६०

न करीं सायासाचें काम

न करीं सायासाचें काम ।
गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांही नेणें ।
आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें ।
नाहीं उरलें दु:खातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार ।
नामें पैलपार तरेन ॥४॥
अभंग १६१

निर्गुणा अंगी सगुण

निर्गुणा अंगी सगुण बाणलें ।
निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी ।
येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले ।
निर्गुण सगुण त्याही गिळियेलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका ।
वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥
अभंग १६२

नेणपणें मिठी घालीन

नेणपणें मिठी घालीन पदरा ।
बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगतों ।
निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हाती ।
मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड ।
आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥
अभंग १६३

नेणों कोणे काय

नेणों कोणे काय देवासी दिधलें ।
मागत वाहिलें तयापाशीं ॥१॥
पेरावें जें शेती तेचि फळप्राप्ती ।
वाया काय गुंती आपुले मनीं ॥२॥
तेव्हां घ्यावें हेंचि पूर्वापार ।
पुराणी विचार हाचि आहे ॥३॥
चोखा म्हणे उगें देवासी रुसती ।
आपुलें मनाप्रती प्रसती ना ॥४॥
अभंग १६४

पांडुरंगी लागो मन

पांडुरंगी लागो मन ।
कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला ।
देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य ।
तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं ।
कैंचा राही विटाळ ॥४॥
अभंग १६५

फुलाचे अंगीं सुवास

फुलाचे अंगीं सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृत्तिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांझण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटले घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाही ।
विवेकी तिये ठायीं न गुंतेची ॥४॥
अभंग १६६

बावरे मन रात्रंदिवस

बावरे मन रात्रंदिवस झालें ।
नावरे वाहिलें काय करूं ॥१॥
येणें माझा कैसा घेतिलासे लाहो ।
आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥
न धरीं तयाची संगतीची गोडी ।
झाली वोढावोढी साच दिसे ॥३॥
चोखा म्हणे याचा न तुटे संबंध ।
येणें मज बाध लाविलासे ॥४॥
अभंग १६७

बैसोनि निवांत करीन

बैसोनि निवांत करीन चिंतन ।
काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपें वर्म ।
अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥
या परतें साधन आन कांहीं नेणें ।
अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी ।
येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं ।
राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥
अभंग १६८

याचिया छंदा जे लागले

याचिया छंदा जे लागले प्राणी ।
त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥
याचा संग पुरे याचा संग पुरे ।
अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥
स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा ।
किती फजीतखोरा बुझवावें ॥३॥
न जावें तेथें हाटेची जाय ।
करूं नये तें करीं स्वयें न धरीं कांही ॥४॥
चोखा म्हणे तुज तुझीच आण ।
होई समाधान घटिकाभरी ॥५॥
अभंग १६९

लिहिलें संचितीं न चुके

लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं ।
वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें ।
हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे ।
आतां वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी कां वासना ।
तैशीच भावना होत जात ॥४॥
अभंग १७०

वाढलें शरीर काळाचें

वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें ।
काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥
बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं ।
आपणची भोगी वृद्धपण ॥२॥
आपुला आपण न करी विचार ।
काय हे अमर शरीर याचें ॥३॥
चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी ।
मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥ 
अभंग १७१

वांया हांव भरी गुंतले

वांया हांव भरी गुंतले कबाडी ।
करिताती जोडी पुढीलाची ॥१॥
ऐसे तें वोंगळ देख आंधळे ।
भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥
नाशिवंत अवघे मानियेलें साच ।
करिती हव्यास जन्मोजन्मीं ॥३॥
चोखा म्हणे यासी काय उपदेश ।
भोगी नर्कवास कल्पवरी ॥४॥
अभंग १७२

वांया हांव भरी

वांया हांव भरी नका घालूं मन ।
चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥
हेंचि साधन साराचें सार ।
येणें भवपार उतरती ॥२॥
न करी आळस नामाचा क्षणभरी ।
कामक्रोध दुरी पळे येणें ॥३॥
दया क्षा शांति संतांची संगती ।
यां परती विश्रांती दुजी नाहीं ॥४॥
चोखा म्हणे दृढ धरावा विश्वासा ।
नामाचा निजध्यास सर्वकाळ ॥५॥
अभंग १७३

संतांचा अनुभव संतची

संतांचा अनुभव संतची जाणति ।
येर ते हांसती अभाविक ॥१॥
नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणें जन्म मरण जेणे खुंटविलें ॥२॥
सेवेचा प्रकार जाणे हनुमंत ।
तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥
सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली ।
ऐक्य रूपें चाली मिरवली ॥४॥
चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार ।
तेथें मी पामर काय वानूं ॥५॥
अभंग १७४

आमुचा आम्ही केला

आमुचा आम्ही केला भावबळी ।
भावें वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण ।
भावें देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळें घातिलासे वेढा ।
देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला ।
भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ॥४॥
अभंग १७५

शुद्ध भाव शुद्धमती

शुद्ध भाव शुद्धमती ।
ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप ।
तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकी तारिले ।
जड जीव उद्धरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं ।
चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥
अभंग १७६

काळाचा विटाळ जीवशिवा

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं ।
बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं ।
स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ ।
विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ ।
चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥
अभंग १७७

कोण तो सोंवळा

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा ।
दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला ।
मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा ।
सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा ।
अरूपें आगळा विटेवरी ॥४॥
अभंग १७८

उपजले विटळीं मेले

उपजले विटळीं मेले ते विटाळीं ।
राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगें मरती ।
परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी ।
उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
अंती यम फांसा गळां पडे ॥४॥
अभंग १७९

नीचाचे संगती देवो

नीचाचे संगती देवो विटाळला ।
पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा ।
पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे ।
वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा ।
तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥
अभंग १८०

पंचही भूतांचा एकचि

पंचही भूतांचा एकचि विटाळ ।
अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण ।
विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला ।
सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें ।
विटाळा परतें आहे कोण ॥४॥
अभंग १८१

वेदासी विटाळ शास्त्रासी

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ ।
पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ ।
काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ ।
शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥
अभंग १८२

बहुत प्रकार बहुत

बहुत प्रकार बहुत या जगाचे ।
काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥
नीच हे याति अनामिक नांव ।
तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥
चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे ।
हीनत्व जन्मांचे पदरीं आहे ॥३॥
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों ।
बहु हे पीडिलों वियोगानें ॥४॥
अभंग १८३

आजि सोनियाचा दिवस

आजि सोनियाचा दिवस धन्य झाला ।
प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥
माझें मज दिलें माझें मज दिलें ।
माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥
बहुत आटणी करितां दाटणी ।
सुखाचें सुख मनीं कोंदाटलें ॥३॥
माझा मज देव दावियेला देहीं ।
मी तूं पण गेलें ठाय़ींच्या ठायीं ॥४॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा ।
पोकरितों धांवा नामदेवा ॥५॥
अभंग १८४

कैसा या लोभें गोवियेला

कैसा या लोभें गोवियेला ।
हा तो आपैसाचि राहिला ॥१॥
मज तो वाटे चोज याचे ।
खातां खादलें खाय साचें ॥२॥
ऐसी काय तुझी भीड ।
पडली ते न कळे गूढ ॥३॥
चोखा म्हणे भुलवण्या ।
धन्य नामया शाहाण्या ॥४॥
अभंग १८५

कोपटी तळपती गाई

कोपटी तळपती गाई ।
हाडाचीं बेडी पडेल पायीं ।
तोंड चुकवितां इज्जत जाई ।
मग वाचोनियां ।
काय कीजे मायबाप ॥१॥
जोहार पाटील बाजी ।
चावडी चलाना कां जी ।
ऐसें सांगत आलों आजी ।
बहुत बाकीं थकली की मायबाप ॥२॥
हिमायत येथें न चले कांही ।
दुस्तर वार्ता पुढें भाई ।
वरते पाय खालीं डोई ।
नव महिने होईल कीं जी मायबाप ॥३॥
उगलीं कां कोंडितां गुरें ।
गांवीची कां बुजवितां द्वारें ।
फेडा झाला बरोबर ।
नका उणें पुरें की मायबाप ॥४॥
यंदा आली चेवाची पाळीं ।
तोंडें कां जी करितां काळीं ।
चावडी चला या वेळीं ।
शिव्या गाळी घेऊं नका की मायबाप ॥५॥
कुळकर्णी आपुल्या स्वाधीन करा ।
आडखर्चाचा ताळा धरा ।
दयाळु मायाळु बाप करा ।
येईल मुजरा निजसत्वें की मायबाप ॥६॥
विठु पाटलाचा महार चोखामेळ्याचा जोहार ।
सकळ संतांचा कारभार ।
मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥७॥
अभंग १८६

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला जाहलों ।
तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥
बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥
अभंग १८७

वासुदेव दिंडी गान

वासुदेव दिंडी गान ।
प्रसाद मागूं आले दान ।
आणिक आले कोण कोण ।
त्यांची नावें परिसावी ॥१॥
ब्राम्हाण क्षत्रिय शूद्र वाणि ।
मागूं आल्या चारी खाणी ।
लिहिणार जोशी पंडित गणीं ।
चाटे भाट आले ते ॥२॥
गोंधळ डफ गाणें बहीरव जोगी ।
बाळसंतोषी आणि बैरागी ।
फकीर डाकुलता तो वेगी ।
कान फाडया आला तो ॥३॥
सारमंडळी आलासे ।
राहा विनोदें बोलतसे ।
चोखा महार जोहार करितसे ।
प्रसाद देई म्हणोनी ॥४॥
अभंग १८८

अनादि निर्मळ वेदाचें

अनादि निर्मळ वेदाचें जें मूळ ।
परब्रह्म सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटीं राहिलासे उभा ।
नीळवर्ण प्रभा फांकतसे ॥२॥
आनंदाचा कंद पाउलें साजिरीं ।
चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥
अभंग १८९

गोजिरें साजिरें श्रीमुख

गोजिरें साजिरें श्रीमुख चांगलें ।
ध्यानीं मिरवलें योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं ।
वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी ।
पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीटकुंडलें ।
प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥
अभंग १९०

व्यापक व्यापला तिहीं

व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं ।
चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥
शंख चक्र करीं वैजयंती माळा ।
नेसला पिवळा पितांबर ॥२॥
कटावरी जेणें कर हे ठेविले ।
ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥
चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद ।
नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥
अभंग १९१

अनाम जयासी तेंचि

अनाम जयासी तेंचि रुप आलें ।
उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्‌ठावीस ।
समचरणीं वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू ।
जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥
अभंग १९२

सर्वही सुखाचें ओतिलें

सर्वही सुखाचें ओतिलें श्रीमुख ।
त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्ही कटीं सम पाय विटे ।
शोभले गोमटें बाळरुप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचें धन ।
चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥
अभंग १९३

उतरलें सुख चंद्रभागेतटीं

उतरलें सुख चंद्रभागेतटीं ।
पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें ।
ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती ।
तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
न कळे ज्याचा पार श्रुति-शास्‍त्रां ॥४॥
अभंग १९४

सुखाचें जें सुख

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं ।
पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥
साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥
कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
शंख चक्र मिरवले गदापहा ॥३॥
चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी ।
चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥
अभंग १९५

ज्या कारणें वेदश्रुति

ज्या कारणें वेदश्रुति अनुवादती ।
तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी ।
तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविका कारणें उभवोनि हात ।
उदारपणें देत भुक्तिमुक्ती ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ ।
स्‍त्री शूद्र चांडाळा सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला ।
म्हणोनि स्थिरावला भीमातटीं ॥५॥
अभंग १९६

सुंदर मुखकमल कस्तुरी

सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं ।
उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ ।
देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं ।
गरूडवाहन हरी देखियला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर ।
निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥
अभंग १९७

जाणतें असोनी नेणतें

जाणतें असोनी नेणतें पैं झालें ।
सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो ।
न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा ।
त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर ।
तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥
अभंग १९८

वैकुंठ पंढरी भिंवरेचे

वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें ।
धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा ।
वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान ।
विटे समचरण ठेवियेले ॥४॥
अभंग १९९

मज तों नवल वाटतसें

मज तों नवल वाटतसें जीवीं ।
आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रह्म भुललें ।
गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें ।
विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे कैसा हा नवलाव ।
देवाधिदेव वेडावला ॥४॥
अभंग २००

आपुलिया सुखा आपणचि

आपुलिया सुखा आपणचि आला ।
उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति ।
शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा ।
कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥
अभंग २०१

ज्या सुखा कारणें योगी

ज्या सुखा कारणें योगी शिणताती ।
परी नव्हे प्राप्ती तयांलागीं ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें ।
उघडेंचि आलें पढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमार्गे ।
भक्तांचिया पांगे न बैसेचि ॥३॥
युगें अठ्‌ठावीस होऊनियां गेलें ।
नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी ।
कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥
अभंग २०२

पंढरीचे सुख नाहीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥
अभंग २०३

भाविकांच्या लोभा होऊनी

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत ।
उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा ।
गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड ।
भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली ।
कृपेची साउली दीनां करी ॥४॥
अभंग २०४

अंगिकार करी तयाचा

अंगिकार करी तयाचा विसर ।
न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटी ।
उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभपर ।
वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळू माउली ।
उभी ती राहिली विटेवरी ॥४॥
अभंग २०५

अवघी पंढरी भुवैकुंठ

अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी ।
नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं ।
पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें ।
तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे ।
सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवलें कर दोनीं कटावरी ।
ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनी ।
सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी ।
चोखा परोपरी नाचतसे ॥७॥
अभंग २०६

दुर्लभ होतें तें सुलभ

दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें ।
आपण नटलें सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें ।
उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार ।
वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरूड टके पताका शोभती ।
बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड ।
उभ उभी कोड पुरवितो ॥५॥
अभंग २०७

देखिला देखिला योगियांचा

देखिला देखिला योगियांचा रावो ।
रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस ।
धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥
गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा ।
नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥
चोखामेळा तेथें वंदितो चरण ।
घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥
अभंग २०८

भक्तांचियां लोभा वैकुठं

भक्तांचियां लोभा वैकुठं सांडिलें ।
उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरी ।
जड जीवा उद्धरी नामें एका ॥२॥
बांधियलें ब्रीद तोडर चरणीं ।
त्रैलोक्याचा धणी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्‌ठल ।
नलगे काळ वेळ नाम घेतां ॥४॥
अभंग २०९

मुळींचा संचला आला

मुळींचा संचला आला गेला कोठें ।
पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा ।
योगियांचा राणा पंढरिये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात ।
वाट जो पहात अनुदिनी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ ।
दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥
अभंग २१०

बहुतांचे धांवणें केलें

बहुतांचे धांवणें केलें बहुतापरी ।
उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥
तोचि महाराज चंद्रभागें तीरीं ।
उभा विटेवरी विठ्‌ठल देवो ॥२॥
भक्तीचा आळुका भावाचा भुकेला ।
न कळे ज्याची लीला ब्रह्मादिका ॥३॥
चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी ।
दरुशनें उद्धरीं जडजीवां ॥४॥
अभंग २११

माझा शिण भाग

माझा शिण भाग अवघा हरपला ।
विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें ।
समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी ।
विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार ।
होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ ।
आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥
अभंग २१२

इनामाची भरली पेठ

भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट 
संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी ।
वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी ।
घेत पायवणी संतांची ॥४॥
अभंग २१३

नेणते तयासी नेणता

नेणते तयासी नेणता लहान ।
थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा ।
रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें ।
उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी ।
गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥
अभंग २१४

टाळी वाजवावी गुढी

टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कउलांची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जय जयकार भीमातीरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें ।
दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥
अभंग २१५

भाकसमुद्रीं भरियेलीं

भाकसमुद्रीं भरियेलीं केणें ।
आणियेलें नाणें द्वारकेचें ॥१॥
बाराही मार्गाची वणीज्ज करी ।
पंढर हे पुरी नामदेव ॥२॥
चोखा म्हणे लोटांगणीं जाऊं ।
नामदेव पाहूं केशवाचा ॥३॥
अभंग २१६

चोखट चांग चोखट

चोखट चांग चोखट चांग ।
एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणीं ।
अवघी सुकृतांची खाणी ॥२॥
महापातकी नासले ।
चोखट नाम हें चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा ।
विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥
अभंग २१७

अवघा प्रेमाचा पुतळा

अवघा प्रेमाचा पुतळा ।
विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी ।
तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा ।
गाये नाचे चोखामेळा ॥३॥
अभंग २१८

करीं सूत्र शोभे

करीं सूत्र शोभे कटावरी ।
तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
बरवे दिसती जानू ।
तेथें मिरवे पात्रा कान्हो ॥२॥
पायीं वाजती रुणझुण घंटा ।
तोचि नामयाचा नागर विठा ॥३॥
वाम चरणींचा तोडरु ।
परिसा उठतसे डोंगरु ॥४॥
दक्षिण चरणींचा तोडरु ।
जयदेव पदाचा तरु ॥५॥
विटेवरी चरण कमळा ।
तो हा जाणा चोखा मेळा ॥६॥
अभंग २१९

बहुत हिंडलों देश

बहुत हिंडलों देश देशांतर ।
परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों ।
मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या ।
मनाच्या राहिल्या येरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भुवैकुंठ ।
मनाचे हे कष्‍ट दूर गेले ॥४॥
अभंग २२०

श्रीमुख चांगलें कांसे

श्रीमुख चांगलें कांसे पीतांबर ।
वैजयंती हार रुळे कंठीं ॥१॥
तो माझ्या जीवींचा जिवलग सांवळा ।
भेटावा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धांवणें केलें नानापरी ।
पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्‍त्रांसी जो साक्षी ।
तोचि आम्हां रक्षी नानापरी ॥४॥
अभंग २२१

कोणी पंढरीसी जाती

कोणी पंढरीसी जाती वारकरी ।
तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडी ।
अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझें मायबाप सोयरे सज्जन ।
तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे ते माहेर निजाचें ।
जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥
अभंग २२२

वेध कैसा लागला

वेध कैसा लागला वो जीवा ।
नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी ।
सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचें गाती जे नाम ।
ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी ।
क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण ।
जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥
अभंग २२३

न करीं आळस

न करीं आळस जाय पंढरीसी ।
अवघी सुख राशि तेथें आहे ॥१॥
पाहातां भिंवरा करीं एक स्नान ।
घालीं लोटांगण पुंडलीका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं ।
तयां सुखा सरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे तहान भूक ।
चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥
अभंग २२४

बहुत कनवाळु बहु

बहुत कनवाळु बहु हा दयाळु ।
जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥
जात वित गोत न पाहेचि कांहीं ।
घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥
न मागतां आभारी आपेंआप होती ।
भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी ।
भवभय वारी दरूशने ॥४॥
अभंग २२५

जया जे वासना

जया जे वासना ते पुरवीत ।
आपण तिष्‍ठत राहे द्वारीं ॥१॥
बळीचिया भावा द्वारपाळ होय ।
सुदाम्याचें खाय पोहें सुखें ॥२॥
विदुराचें घरीं आवडीं कण्या खाय ।
हात पसरिताहे भाजी पाना ॥३॥
गौळियाचे घरीं करीतसे चोरी ।
काला स्वयें करी गोपाळांसी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा नाटकी श्रीहरी ।
तोचि हा पंढरी भीमातटीं ॥५॥
अभंग २२६

सुखा कारणें करी

सुखा कारणें करी तळमळ ।
जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा ।
चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
नलगे वेचावें धनाचिये पेटी ।
धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन ।
राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार ।
नाम एक सार विठोबाचें ॥५॥
अभंग २२७

नाम हें सोपें

नाम हें सोपें जपतां विठ्‌ठल ।
अवघेंचि फळ हाता लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्‍ठान ।
तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती ।
बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन ।
तुटेल बंधन भवपाश ॥४॥
अभंग २२८

महादोषराशि पापाचे कळप

महादोषराशि पापाचे कळप ।
नामें सुखरुप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करुं नका कोणी ।
नाम जपा वाणीं सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव ।
आन ठावाठाव करुं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जेवितां वाचे ।
नाम श्रीविठ्‌ठलाचें उच्चारावें ॥४॥
अभंग २२९

भेदाभेद कर्म नकळे

भेदाभेद कर्म नकळे त्याचें वर्म ।
वाउगाचि श्रम वाहतां जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं ।
पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्‍त्राचा अनुवाद ।
नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच नकळे ।
विठ्‌ठलाचे बळें नाम घेतो ॥४॥
अभंग २३०

त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि

त्रैलोक्यवैभव ओंवाळोनि सांडावें ।
नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुता परी ।
नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्‌ठल एक नाम ।
गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा ।
भवभय पीडा येणें वारे ॥४॥
अभंग २३१

आम्हां अधिकार उच्छिष्‍ट

आम्हां अधिकार उच्छिष्‍ट सेवन ।
संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपेरें विठोबाचे नाम ।
आणिक नाही वर्म दुजें काही ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें ।
संताच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा ।
पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥
अभंग २३२

आम्हां नकळे ज्ञान

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद ।
शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्‍टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥
अभंग २३३

योग याग तप

योग याग तप व्रत आणि दान ।
करितां साधन नाना कष्‍ट ॥१॥
सुलभ सोपेरें नाम विठोबाचें ।
सकळ साधनांचें मूळ बीज ॥२॥
येणें भवव्यथा तुटेल जीवाची ।
प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥
म्हणोनि नामाचा करा गदारोळा ।
म्हणे चोखामेळा विठ्‌ठल वाचे ॥४॥
अभंग २३४

आणिक दैवतें काय

आणिक दैवतें काय बापुडीं ।
काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा ।
न सांगतां सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटनी ।
न लगे तीर्थाटणीं काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥
अभंग २३५

नामाचें सामर्थ्य विष

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत ।
ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल ।
नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन ।
सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा ।
येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥
अभंग २३६

गणिका अजामेळे काय

गणिका अजामेळे काय साधन केलें ।
नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥
नवले हें पाहा नवल हें पाहा ।
अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें ।
ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥
ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार ।
वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
उफराटें नाम न येचि मुखासी ।
मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा ।
उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥
अभंग २३७

केला अंगीकार

केला अंगीकार ।
उतरिला भार ॥१॥
अजामेळ पापराशी ।
तोही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंची तारिली ।
चोखा म्हणे मात केली ॥३॥
अभंग २३८

शुद्ध भाव शुद्धमती

शुद्ध भाव शुद्धमती ।
ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप ।
तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकी तारिले ।
जड जीव उद्धरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं ।
चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥
अभंग २३९

अवघ्या साधनांचें सार

अवघ्या साधनांचें सार ।
रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम ।
वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी ।
सांगूं गोष्‍टी सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला ।
जीवलग भेटला मायबाप ॥४॥
अभंग २४०

भवाचें भय न धरा

भवाचें भय न धरा मानसीं ।
चिंता अहर्निशीं रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा नलगे सायास ।
जया रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी ।
वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठीं जप हा सर्वदा ।
पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वां अधिकर ।
उंच नीच अपार तरले नामें ॥५॥
अभंग २४१

राम हीं अक्षरें सुलभ

राम हीं अक्षरें सुलभ सोपारी ।
जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा ।
ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका ।
होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार ।
भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें ।
जपावें निधरिं एका भावें ॥५॥
अभंग २४२

कोणासी साकडें गातां

कोणासी साकडें गातां रामनाम वाचे ।
होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार ।
नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं ।
ऐसी साक्ष देती वेदशास्‍त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार ।
राम हा निर्धार जप करीं ॥४॥
अभंग २४३

अवघें मंगळ तुमचें गुण

अवघें मंगळ तुमचें गुण नाम ।
माझा तो श्रम पाहतां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा ।
आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
यापरतें मागणें दुजें नाहीं आतां ।
पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार ।
ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥
अभंग २४४

न करीं सायासाचें

न करीं सायासाचें काम ।
गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांहीं नेणें ।
आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें ।
नाहीं उरलें दुःखातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार ।
नामें पैलपार तरेन ॥४॥
अभंग २४५

अवघा आनंदा राम

अवघा आनंदा राम परमानंद ।
हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार ।
आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥
काम क्रोधांचें न पडती आघात ।
वाचे गातां गीत रामनाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा ।
जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥
अभंग २४६

भवाचें भय न धरा

भवाचें भय न धरा मानसीं ।
चिंता अहर्निशीं रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा नलगे सायास ।
जया रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी ।
वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठीं जप हा सर्वदा ।
पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वां अधिकर ।
उंच नीच अपार तरले नामें ॥५॥
अभंग २४७

राम हीं अक्षरें

राम हीं अक्षरें सुलभ सोपींरे ।
जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा ।
ऐसें बळ आणिकां नाहीं अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका ।
होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार ।
भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपेरें ।
जपावें निर्धारें एका भावें ॥५॥
अभंग २४८

कोणासी साकडें गातां

कोणासी साकडें गातां रामनाम वाचे ।
होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार ।
नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशीं वसे नामापाशीं ।
ऐसी साक्ष देती वेदशास्‍त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार ।
राम हा निर्धार जप करीं ॥४॥
अभंग २४९

अवघें मंगळ तुमचें

अवघें मंगळ तुमचें गुण नाम ।
माझा तो श्रम पाहतां जाये ॥१॥
गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा ।
आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥
यापरतें मागणें दुजें नाहीं आतां ।
अभंग २५०

न करीं सायासाचें

न करीं सायासाचें काम ।
गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांहीं नेणें ।
आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें ।
नाहीं उरलें दुःखातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार ।
नामें पैलपार तरेन ॥४॥
अभंग २५१

अवघा आनंदा राम

अवघा आनंदा राम परमानंद ।
हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार ।
आणीक साचार दुजें नाहीं ॥२॥
काम क्रोधांचें न पडती आघात ।
वाचे गातां गीत रामनाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा ।
जेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥
अभंग २५२

मोहळा मक्षिका गुंतली

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी ।
तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा ।
राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें ।
नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम ।
तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥
अभंग २५३

वोखटे गोमटे असोत

वोखटे गोमटे असोत नरनारी ।
दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म ।
नाम परब्रह्म येचि अर्थीं ॥२॥
योगयोगादि जपतप कोटी ।
एक नाम होटीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्‍टाचार ।
नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥
अभंग २५४

विठ्‌ठल विठ्‌ठल गजरीं

अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर ।
दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरी कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥
अभंग २५५

सप्रेमे निवृत्ति आणि

सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञानदेव ।
मुक्‍ताईचा भाव विठ्‌ठलचरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार ।
नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार ।
आणिक अपार वैष्णवजन ॥३॥
चोखा तयां पायीं घाली लोटांगण ।
वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥
अभंग २५६

संतांचा अनुभव संतचि

संतांचा अनुभव संतचि जाणति ।
येर ते हांसती अभाविक ॥१॥
नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणे ।
जन्म मरण पेणें खुंटविलें ॥२॥
सेवेचा प्रकार जाणे हनुमंत ।
तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥
सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली ।
ऐक्य रुपें चाली मिरवली ॥४॥
चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्‍ठाचार ।
तेथें मी पामर काय वानूं ॥५॥
अभंग २५७

आजि दिवस धन्य

आजि दिवस धन्य सोनियाचा ।
जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती ।
दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ ।
गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥
अभंग २५८

चंदनाच्या संगें बोरीया

चंदनाच्या संगें बोरीया बाभळी ।
हेकळी टाकळी चंदनची ॥१॥
संतांचिया संगें अभाविक जन ।
तयाच्या दर्शनें तेचि होती ॥२॥
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा ।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ॥३॥
अभंग २५९

आम्हां आनंद झाला

आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला ।
देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें ।
देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें ।
ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी ।
उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥
अभंग २६०

देवा नाहीं रुप देवा

देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम ।
देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥
डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला ।
देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥
नवल वाटलें नवल वाटलें ।
देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला ।
देव प्रगटला देहामाजी ॥४॥
अभंग २६१

नवल पाहीं नवल

नवल पाहीं नवल पाहीं ।
पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण ।
दोहींचें कारण तेंच ठाईं ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपालें ।
ह्रुदयीं बिंबलें ह्रुदयची ॥३॥
अभंग २६२

डोळियाचा देखणा

डोळियाचा देखणा पाहतां दिठी ।
डोळाच निघाला देखण्या पोटीं ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा ।
आपोआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला ।
देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥
अभंग २६३

फुलाचे अंगी सुवास

फुलाचे अंगी सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृतिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटलें घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं ।
विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥४॥
अभंग २६४

आमुचा आम्हीं केला

आमुचा आम्हीं केला भावबळी ।
भावें वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण ।
भावें देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळें घातिलासे वेढा ।
देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला ।
भक्ताचा अंकित म्हणूनी झाला ॥४॥
अभंग २६५

देहबुद्धीवेगळें जें आकारलें

देहबुद्धीवेगळें जें आकारलें ।
निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं ।
देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला ।
नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥
चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक ।
सहज मीपण देख मावळलें ॥४॥
अभंग २६६

कर्मातें वाळिलें धर्मातें

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें ।
सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें ।
सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला ।
देहीच भेटला एव आम्हां ॥४॥
अभंग २६७

देहीं देखिली पंढरी

देहीं देखिली पंढरी ।
आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तोहा पांडुरंग जाणा ।
शांति रुक्मिणि निजांगना ॥२॥
आकारलें तितुकें नासे ।
आत्मा अविनाश विठ्‌ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्‌ठल ह्रुदयीं ध्यायीं ।
चोखामेळा जडला पायीं ॥४॥
अभंग २६८

कोणें देखियेलें जग

कोणें देखियेलें जग ।
पांडुरंगा मी नेणें ॥१॥
मौन्यें पारूषली वाणी ।
शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधी कैचे दोन ।
मज पासोन मी नेणें ॥३॥
चोखामेळा म्हणती संत ।
हे ही मात उपाधी ॥४॥
अभंग २६९

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण ।
रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी ।
इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन तेणें वोळे ।
शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणें बोध ।
सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ ।
चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥
अभंग २७०

निगमाचे शाखे आगमाचें

निगमाचे शाखे आगमाचें फळ ।
वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज ।
सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस ।
तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन ।
संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
अभंग २७१

सकळा आगराचें जें

सकळा आगराचें जें मूळ ।
तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती ।
तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा ।
भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला ।
त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥
अभंग २७२

अखंड समाधी होउनी

अखंड समाधी होउनी ठेलं मन ।
गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी ।
तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी ।
मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा ।
जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥
अभंग २७३

निर्गुणा अंगीं सगुण

निर्गुणा अंगीं सगुण बाणलें ।
निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी ।
येरा गाबाळ अवघी काहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले ।
निर्गुण सगुण त्याही गिळीयलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका ।
वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥
अभंग २७४

उपजले विटाळीं मेले

उपजले विटाळीं मेले ते विटाळीं ।
राहिले विटाळीं तेही जाती ॥१॥
रडती पडती तेही वेगे मरती ।
परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी ।
उघडाचि जासी अंतकाळीं ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा ।
अंतीं यम फांसा गळां पडे ॥४॥
अभंग २७५

पंचही भूतांचा एकचि

पंचही भूतांचा एकचि विटाळ ।
अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण ।
विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला ।
सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें ।
विटाळा परतें आहे कोण ॥४॥
अभंग २७६

नीचाचे संगती देवो

नीचाचे संगती देवो विटाळला ।
पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा ।
पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे ।
वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा ।
तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥
अभंग २७७

वेदासी विटाळ शास्‍त्रासी

वेदासी विटाळ शास्‍त्रासी विटाळ ।
पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ ।
काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रह्मीया विटाळ विष्णूसी विटाळ ।
शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंतीं ॥४॥
अभंग २७८

कोण तो सोंवळा

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा ।
दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला ।
मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा ।
सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा ।
अरूपें आगळा विटेवरी ॥४॥
अभंग २७९

काळाचा विटाळ जीवशिवा

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं ।
बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं ।
स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ ।
विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ ।
चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥
अभंग २८०

शुद्ध चोखामेळा

शुद्ध चोखामेळा ।
करी नामाचा सोहळा ॥१॥
यातीहीन मी महार ।
पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती ।
म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ ।
आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥
अभंग २८१

पांडुरंगीं लागो मन

पांडुरंगीं लागो मन ।
कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला ।
देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य ।
तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं ।
कैंचा राही विटाळ ॥४॥
अभंग २८२

जन्मांचें साकडें नाहीं

जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें ।
जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण ।
हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी ।
करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी ।
तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥
अभंग २८३

श्वान अथवा शूकर

श्वान अथवा शूकर हो का मार्जार ।
परि वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा ।
न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्‍ट प्रसाद सेवीन धणिवरी ।
लोळेन परवरी कवतुकें ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी ।
दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥
अभंग २८४

इतकेंचि देईं रामनाम

इतकेंचि देईं रामनाम मुखीं ।
संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं ।
तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये ।
दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी ।
माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥
अभंग २८५

आतां याचा अर्थ

आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा ।
येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी ।
माझें तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया ।
कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास ।
पुरवावी आस मायबापा ॥४॥
अभंग २८६

आतां कासया हा

आतां कासया हा दाखवितां खेळ ।
म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रह्मादिक वेडे पिसे झाले ।
न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा ।
काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविट हा खेळ ।
भुललें सकळ ब्रह्मांडचि ॥४॥
अभंग २८७

बरें झालें येथें

बरें झालें येथें आलोंसे सायासें ।
सुख-दुःख लेशे भोगोनियां ॥१॥
मागिला लागाचें केलेंसें खंडण ।
तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरें मन ठेविले बांधोनी ।
निवांत चरणीं तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले ।
येर तेही केले देशधडी ॥४॥
अभंग २८८

नेणपणें मिठी घालीन

नेणपणें मिठी घालीन पदरा ।
बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगतों ।
निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हाती ।
मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड ।
आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥
अभंग २८९

बैसोनि निवांत करीन

बैसोनि निवांत करीन चिंतन ।
काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपें वर्म ।
अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥
या परतें साधन आन कांहीं नेणें ।
अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी ।
येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं ।
राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥
अभंग २९०

आतां कणकण न

आतां कणकण न करी वाउगी ।
होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोसे पोसणा ।
तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें ते झालें असो कां उदास ।
धरोनिया आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे ।
न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥
अभंग २९१

कांहीं तरी अभय

कांहीं तरी अभय न मिळे उत्तर ।
ऐसे कां निष्‍ठुर झाला तुम्ही ॥१॥
मी तो कळवळोनी मारितसे हाक ।
तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
बोलोनी उत्तरें करीं समाधान ।
येवढेंचि दान मज द्यावें ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आस ।
न करीं उदास माझे माये ॥४॥
अभंग २९२

नेणो तुमचें मन

नेणो तुमचें मन कठिण कां झालें ।
मज कांहीं न कळे पूर्वकर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करुं ।
तेणें पडे विचारु पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण ।
मताचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करुं तें आठवेना ।
निवांत वासना कई होय ॥४॥
अभंग २९३

समर्थांसी रंकें शिकवण

समर्थांसी रंकें शिकवण जैशी ।
माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां ।
परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान ।
तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी ।
करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥
अभंग २९४

अगाध हे कीर्ति विठ्‌ठला

अगाध हे कीर्ति विठ्‌ठला तुमची ।
महिमा आणिकाची काय सांगों ॥१॥
पुराणें भागलीं नेति नेति शब्द ।
श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिकां जेथें न कळेचि अंत ।
तेथे मी पतित काय वानूं ॥३॥
चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार ।
कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥
अभंग २९५

आपुल्या आपण सांभाळोनी

आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें ।
आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वायांचि करणें लौकिकाचा गोवा ।
कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें ।
खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें ।
माझें यांत उणें काय होतें ॥४॥
अभंग २९६

मी तो विकलों तुमचे

मी तो विकलों तुमचे पायी ।
जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालों उतराई देवा ।
तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझें वाहे उदरीं ।
तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥
अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं ।
ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥
अभंग २९७

जगामध्यें दिसे बरें

जगामध्यें दिसे बरें की वाईट ।
ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आतां कोठवरी धरावी हे भीड ।
तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं ।
त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणें न ये उणेपण ।
तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥
अभंग २९८

माझा मी विचार

माझा मी विचार केला असे मना ।
चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें ।
हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट ।
नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा ।
तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥
अभंग २९९

वारंवार किती करुं

वारंवार किती करुं करकर ।
माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण ।
होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी आम्हां होईल आठव ।
हाचि एक भाव धरुं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित ।
तोंवरी हें चित्त दृढ करुं ॥४॥
अभंग ३००

कळेल तैसे बोल

कळेल तैसे बोल तुजचि बोलेन ।
भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥
काय करूं देवा दाटलों जाचणी ।
न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारूं केशवा ।
माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतां पुरे चाळवण ।
आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥
अभंग ३०१

अहो पतितपावना पंढरीच्या

अहो पतितपावना पंढरीच्या राया ।
भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा ।
येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या ।
न करीं पांगिला दुजी यासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट ।
मग मी बोभाट न करी कांहीं ॥४॥
अभंग ३०२

धरोनिया आशा

धरोनिया आशा टाकिलासे ठाव ।
अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया ।
कां हो न ये दया माझी तुम्हां ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणें ।
तुमचें पोसणें मी तो देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां ।
काय आमुची कथा आतां चाले ॥४॥
अभंग ३०३

सुखाचिया लागीं करितों

सुखाचिया लागीं करितों ।
तो अवघेंचि वाव येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना ।
अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडें दिसोनियां आलें ।
न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं ।
सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥
अभंग ३०४

बरें हें वाईट आहे

बरें हें वाईट आहे माझे भाळीं ।
तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥
आतां कोणावरी रूसों नये देवा ।
भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जें संचित तैसें होत जात ।
वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे ।
झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥
अभंग ३०५

बहु कनवाळु होसी

बहु कनवाळु होसी गा देवराया ।
म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥
निवारीं या तापापासोनी सोडवीं ।
करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥
माझीयाचि काजा विलंब दातार ।
कां न करीं त्वरा देवराया ॥३॥
चोखा म्हणे बहु पडिलों काचणी ।
सोडवीं चक्रपाणी वेगीं आतां ॥४॥
अभंग ३०६

कोण माझा आतां

कोण माझा आतां करील परिहार ।
तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय ।
दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटीं ।
आतां नको तुटी करूं देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत ।
ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥
अभंग ३०७

नाहीं देह शुद्ध

नाहीं देह शुद्ध याति अमंगळ ।
अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥
करुं जातां विचार अवघा अनाचार ।
आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥
वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन ।
धिःकारिती जन सर्व मज ॥३॥
अंगसंग कोणी जवळ न बैसे ।
चोखा म्हणे ऐसें जीवित माझें ॥४॥
अभंग ३०८

अहो करुणाकरा

अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा ।
उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें ।
न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार ।
नेणों न कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे ।
उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥
अभंग ३०९

असें करणें होतें

असें करणें होतें तुला ।
तरी कां जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें ।
कांहो निष्‍ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं ।
केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा ।
नका मोकलू केशवा ॥४॥
अभंग ३१०

जनक तूं माझा

जनक तूं माझा जननी जगाची ।
करुणा आमुची कां हो नये ॥१॥
कासया संसार लावियेला पाठीं ।
पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥
जन्म जरा मरण आम्हां सुख दुःख ।
पहासी कौतुक काय देवा ॥३॥
गहिंवरुनी चोखा उभा महाद्वारीं ।
विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥
अभंग ३११

दुःखरुप देह दुःखाचा

दुःखरुप देह दुःखाचा संसार ।
सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती ।
दुःख होतां जाती आपोआप ॥२॥
सोइरे धायरे कवणाचे कवण ।
अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा ।
सोडवीं भवपाशा पासोनियां ॥४॥
अभंग ३१२

भवाचिया भेणें येतों

भवाचिया भेणें येतों काकुळती ।
धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥
पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं ।
येवोनी सांभाळी देवराया ॥२॥
कवणाची असा पाहूं कोणीकडे ।
जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥
अभंग ३१३

नेत्रीं अश्रुधारा उभा

नेत्रीं अश्रुधारा उभा भीमातिरीं ।
लक्ष चरणावरी ठेवोनिया ॥१॥
कांगा मोकलीलें न येसी गा देवा ।
काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणें करुं भक्ती नेणें करूं सेवा ।
न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसांवा ।
पोकारितों धांवा म्हणोनियां ॥४॥
अभंग ३१४

ऊंस डोंगा परी

ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥
अभंग ३१५

विठोबा पाहुणा आला

विठोबा पाहुणा आला आमुचे घरा ।
निंबलोण करा जीवें भावें ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती ।
ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट ।
जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥
अभंग ३१६

पाहतां पाहतां वेधियेला

पाहतां पाहतां वेधियेला जीव ।
सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा ।
कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता ।
विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं ।
चोखामेळा दंडवत करी ॥४॥
अभंग ३१७

यातीहीन मज म्हणती

यातीहीन मज म्हणती देवा ।
न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम ।
वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस ।
संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण ।
पदरीं घेतलें मज दीना ॥४॥
अभंग ३१८

हीन याती माझी

हीन याती माझी देवा ।
कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती ।
तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर ।
सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा ।
करूणा भाकी चोखामेळा ॥४॥
अभंग ३१९

तुम्हांसी शरण बहुत

तुम्हांसी शरण बहुत मागं आले ।
तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा ।
माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा ।
म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे ।
नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥
अभंग ३२०

अखंड नामाचें चिंतन

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ ।
तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें ।
काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम ।
येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी ।
येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥
व्हॉट्सअॅप